करमाळा (सोलापूर) : श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने ४ फेब्रुवारी २०२४ ला सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे, अशी माहिती श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश चिवटे यांनी दिली आहे. या विवाह सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी आज (शुक्रवारी) भाजप कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
श्रीराम प्रतिष्ठानकडून सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा घेण्याचे हे दुसरे वर्ष आहे. चिवटे म्हणाले, गेल्यावर्षी श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात २१ जोडप्यांचे विवाह झाले होते. हा सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्सवात व आनंदाने पार पडला. या वर्षीही सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे. करमाळा तालुक्यातील व परिसरातील इच्छुक नागरिकांनी श्रीराम प्रतिष्ठान किंवा भाजप संपर्क कार्यालय (गायकवाड चौक, करमाळा) येथे संपर्क साधावा, असे आवाहन चिवटे यांनी केले आहे.