करमाळा (सोलापूर) : ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलच्या ‘डिजिटल विशेषांक’ या पुस्तकाचे प्रकाशन व करमाळा शहरातील डॉक्टर, सामाजिक उपक्रम राबणारी गणेशोत्सव मांडळे, सामाजिक कार्यकर्ते व कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा हॉटेल राजयोग येथे सन्मान होणार आहे. यावेळी सामाजिक, राजकीय, प्रशासकीय व कृषी अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
काय सांगता न्यूज पोर्टल हे करमाळा तालुक्यात एक वर्षापासून विश्वसनीय बातम्या देत आहे. सकारात्मक आणि प्रेरणादायी बातम्या देत नागरिकांचे प्रश्न मांडत आहे. फक्त प्रश्नच मांडत नाही तर त्याची सोडवणूक करत आहे. या न्यूज पोर्टलने वर्षभरात अनेक सकारात्मक आणि प्रेरणादायी व संघर्ष करत असलेल्या व्यक्ती समाजापुढे आणल्या आहेत. गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी जपत अनेक मंडळे काम करत आहेत. त्यातील काही मंडळांचा आम्ही गौरव करत आहोत. या मंडळांची संख्या जास्त आहे. मात्र काही मंडळांचा आम्ही यावर्षी सन्मान करणार आहोत. इतर मंडळांचेही दखलपात्र काम आहे. परंतु एकाचवेळी सर्वांचा सन्मान करणे अशक्य आहे.
यावर्षी सरकार मित्र मंडळ, दत्त पेठ तरुण मंडळ, राशीन पेठ तरुण मंडळ, गजराज तरुण मंडळ, गजानन स्पोर्ट क्लब वेताळ पेठ, नंदन प्रतिष्ठान व कर्मवीर अण्णासाहेब जगताप मित्र मंडळाचा गौरव केला जाणार आहे. डॉ. अपर्णा भोसले, डॉ. स्वाती घाडगे, डॉ. अफ्रिन बागवान, डॉ. शिवानी पाटील व डॉ. प्रीती शेटे यांचा संघर्ष प्रेरणादायी आहे. मेहनत आणि जद्दीने अभ्यास करून त्या डॉक्टर झाल्या त्यांचाही येथे सन्मान होणार आहे. कृषी क्षेत्रातही महिला कमी नाहीत हे हर्षली नाईकनवरे यांनी दाखवून दिले आहे. वाचनाशिवाय पर्याय नाही. मुलांवर संस्कार झाले तरच भविष्य आहे या जाणिवेतून अनुसया तळपाडे यांनी नोकरी लागत असतानाही केवळ मुलांसाठी स्वतःच्या इच्छा अपूर्ण ठेवत नोकरी केली नाही. त्याही मातेचा येथे गौरव होणार आहे.
सासू- सून, सून- दीर यांचे जमत नसल्याने अनेकांची कुटुंब विभक्त झाल्याची आपण उदाहरणे पाहतो. मात्र आपल्या भोळ्या दिराची न लाजता आणि विनाखंड सेवा करत आहेत त्या भगिनेने एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला आहे. त्या शिक्षक गीता काळे यांचाही सन्मान केला जात आहे. समाजाला प्रेरणा देणाऱ्या या व्यक्ती आहेत. त्यांचा सन्मान आणि पुस्तकाचे प्रकाशन आज (रविवारी) सांयकाळी साडेपाच वाजता होणार आहे. या पुस्तकाचे संपादन अशोक मुरूमकर यांनी केले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.