Halginad agitation on behalf of RPI against Kamagaja of Karmala Upazila Hospital

करमाळा (सोलापूर) : करमाळा उपजिल्हा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे, असा अरोप करत आरपीआय (आठवले) युवाचे जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गायकवाड चौक येथून तहसील कार्यालय दरम्यान आज (शुक्रवारी) दुपारी साडेबारा वाजता हालगीनाद आंदोलन करण्यात आले. करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील मनमानी कारभार करणार्या डॉक्टरांची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. या आंदोलनाला मातंग एकता आंदोलन, बहुजन संघर्ष सेना यांनी पाठिंबा दिला आहे. सुहास ओहोळ यांनी यावेळी रुग्णलयातील कारभारावर घणाघात केला. यशपाल कांबळे, राजाभाऊ कदम, प्रफुल दामोदर आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. करमाळा पोलिसांनी यावेळी बंदोबस्त ठेवला होता.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *