आज रविवारी (१२ नोव्हेंबर २०२३) दिवाळी आणि लक्ष्मीपूजन आहे. दिवाळीची ही पहाट अभ्यंगस्नाने होते. यादिवशी दीपावली, नरक चतुर्दशी, अभ्यंग स्नान, लक्ष्मी- कुबेर पूजन या सर्वांनी आनंद द्विगुणीत होईल. तेव्हा या दिवाळीनिमीत्त खास शुभेच्छा तुमच्यासाठी देत आहोत.
आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात दिवाळीचा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीय या दरम्यान दीपोत्सव साजरा केला जातो. सहा महिन्यांची प्रदीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरु होताच त्या प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटत असावे आणि त्यासाठीच ते हा आनंदोत्सव करीत असावेत, असे म्हटले जाते.
१४ वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले, ते याच दिवसात. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो, अशी मान्यता आहे. या दिवाळीनिमीत्त आपल्या नातेवाईकांना, मित्र मैत्रींणीना शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छा संदेश.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
“दिवाळी आहे पर्व सुखांचं, प्रकाशाचं
लक्ष्मी आपल्या घरी येण्याचं
या दिवाळीला तुम्हाला मिळो आयुष्यभराचा आनंद
लक्ष्मी पूजन, नरक चतुर्थी आणि
दिवाळी पहाटेच्या मनपूर्वक शुभेच्छा”
“दिव्यांच्या लख प्रकाशाने
उजळलेली आजची रात्र आहे,
आपण सर्व मिळून हा
पवित्र सण साजरा करूया,
कारण आज सर्व सणामधील सर्वात
मोठा सण दिवाळी आहे
आपणास व आपल्या परिवारास
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा”
“धनलक्ष्मी,धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी
या दीपावलीत या अष्टलक्ष्मी, तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा”
दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा
दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा
“दिवाळी आहे पर्व सुखांचं, प्रकाशाचं
लक्ष्मी आपल्या घरी येण्याचं
या दिवाळीला तुम्हाला मिळो आयुष्यभराचा आनंद
लक्ष्मी पूजन, नरक चतुर्थी आणि
दिवाळी पहाटेच्या मनपूर्वक शुभेच्छा”