Video : हाती टाळ, खांद्यावर पताका, मुखी हरिनामाचा जयघोष करत करमाळ्यात हजारो वारकरी दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : टाळ- मृदूंगाच्या तालात ‘ज्ञानोबा- तुकाराम’चा गजर करत हजारो वारकरी आज (शनिवार) वेगवेगळ्या मार्गाने करमाळ्यात दाखल झाले आहेत. आषाढी एकदशीनिमित्त लाखो वारकरी दिंड्यांच्या माध्यमातून पायी चालत पंढरपूरला जातात. धुळे, जळगाव, अहिल्यानगर, बीड आदी भागातील दिंड्या करमाळा मार्गे पंढरीला जातात. आज अनेक दिंड्या करमाळ्यात आल्या आहेत. त्यामुळे हरिनामाच्या जयघोषाने शहर दुमदुमले आहे. दिवसभरात अनेक दिंड्या पंढरीच्या दिशेने मार्गदस्थही झाल्या आहेत.

उद्या (रविवारी) मानाची श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी करमाळा तालुक्यात (रावगाव) प्रवेश करणार आहे. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी सेवा देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. जातेगाव ते टेंभुर्णी मार्गावर वाहतुकीत अडथळा होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त आहे. काही ठिकाणी एकेरी मार्ग असल्याने अपघात होऊ नयेत म्हणून काळजी घेतली जात आहे. ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी अल्पोपहार व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांना गोळ्या औषध देखील वाटप केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *