करमाळा (सोलापूर) : सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे २० जानेवारीपासून आमरण उपोषण करणार आहेत. त्याचे नियोजन करण्यासाठी करमाळ्यात रविवारी (ता. १४) विकी मंगल कार्यालय येथे बैठक होणार आहे. जरांगे यांनी आवाहन केल्याप्रमाणे मुंबईला आमरण उपोषण करण्यासाठी करमाळ्यातून समाज बांधव जाणार आहेत. जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी या मराठा आरक्षण लढ्यात मराठा समाजातील बंधू भगिनींनी सहभागी होण्यासाठी चर्चा विनिमय करण्यासाठी सोलापूर जिल्हा मराठा समन्वयक, जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करमाळ्यात रविवारी विकी मंगल कार्यालय येथे दुपारी 3 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे.



