करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातून सात दिवसात तीन व्यक्ती बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. याबाबत करमाळा पोलिसात मिसिंग दाखल झाले असून यामध्ये दोन महिला व एक पुरुष आहे. तिघांचेही वय ३० च्या आत आहे. २ तारखेला करमाळा शहरातून २० वर्षाची एक मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद आहे तर ७ तारखेला हिवरवाडीतील २५ वर्षाची एक महिला व मांगीतील २७ वर्षांचा एक पुरुष बेपत्ता झाल्याची नोंद करमाळा पोलिसात दाखल झाली आहे. या तिघांचीही नोंद मिसिंग म्हणून दाखल झाली आहे.
करमाळा तालुक्यातून सात दिवसात तिघे बेपत्ता
