भाजपचे चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त बिटरगाव श्री येथे किर्तन महोत्सव

Kirtan Mahotsav at Bitargaon Shree on the occasion of BJP Chivte birthday

करमाळा (सोलापूर) : भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये करमाळ्यात तालुकास्तरीय भजन व शास्त्रीय संगीत स्पर्धा झाल्या. त्यानंतर बुधवारी (ता. 25) ते रविवारी (ता. 30) करमाळा तालुक्यातील विविध गावात भव्य रक्तदान शिबिर होणार आहे.

याबरोबर बिटरगाव श्री येथे महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार हभप किर्तनकेसरी अक्रूर महाराज साखरे (गेवराई), हभप भागवताचार्य संदीप महाराज खंडागळे (पैठण), हभप पुरुषोत्तम महाराज पाटील (बुलढाणा), हभप समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर व हभप महंत विठ्ठल महाराज शास्त्री (गहीनाथगड) यांचे किर्तन होणार आहे. याबरोबर विविध गावांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व धार्मिक ठिकाणी बैठक बाकडे व वृक्षारोपण करण्यात येणार आहे. झरे या ठिकाणी भव्य निकाली कुस्त्या होणार आहेत, अशी माहिती गणेश चिवटे अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *