करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी करत एका सभासदाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज (सोमवारी) सुनावणी झाली. याचिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून यामध्ये पुढील कोणती तारीख असेल याची उत्सुकता लागली आहे.
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे भाळवणी येथील सभासद रामभाऊ शिंदे यांनी निवडणुकीबाबाबत याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी झाली आहे, असे शिंदे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे. शिंदे म्हणाले प्रशासकांकडून कारखान्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कारखान्यावर संचालक मंडळ येणे आवश्यक आहे. त्यामुळे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली आहे. यावेळी मी स्वतः हजर होतो. यावर आमच्याकडून ऍड. चंद्रचूड हे काम पाहत आहेत. या सुनावणीनंतर पुढील तारीख मिळणार असून ही तारीख किती असेल हे उद्या सकाळी समजेल, असे त्यांनी सांगितले आहे.