सोलापूर : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 11 जुलैला नातेपुते पोलिस ठाणे हददीत व 12 जुलैला श्री तुकाराम महाराज यांची पालखी अकलुज पोलिस ठाणे हददीत प्रवेश करणार आहे. दोन्ही पालखी सोहळयात लाखो वारकरी सहभागी होणार असल्याने वारकरी हे पायी पंढरपूरकडे येत असतात. पालखीबरोबर त्यांचे दिंडया व वाहने सोबत असतात. त्यामुळे पालखी मार्गावर वाहतुकीची कोंडी होवु नये याकरीता 9 ते 18 जुलै दरम्यान अकलुज व पंढरपूर या पालखी मार्गावर या वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 च्या कलम 33 (1) (ब) अन्वये प्राप्त अधिकारान्वये आदेश पारीत केले आहेत. पंढरपूरकडून पुणे येथे जाणारे वाहने वाखरी- साळमुख फाटा- पिलीव- म्हसवड- फलटण किंवा पंढरपूर- टेंभुर्णी पर्यायी मार्गाने पुणेकडे जातील. पुणे- फलटण येथुन पंढरपूरकडे येणारी वाहने फलटण-म्हसवड-पिलीव-साळमुख चौक-पंढरपूर अथवा पुणे-टेभुर्णी मार्गे पंढरपूरकडे येतील. वेळापूर येथुन पंढरपूर कडेयेणा-या वाहने साळमुख चौक-सातारा रोड या पर्यायी मार्गाने पंढरपूरकडे येतील. सांगोला येथून पुणेकडे जाणा-या वाहने (सांगोला येथून पुणेकडे जाणारी जड वाहतुक वगळून – सांगोला-साळमुख चौक वेळापूर-अकलुज-इंदापूर.) या पर्यायी मार्गाने जातील. पुणे येथुन इंदापूर मार्ग पंढरपूर येथे येणारी वाहने टेंभुर्णी-पंढरपूर पर्यायी मार्गानी येतील. अकलूज येथून पंढरपूर मार्गे सोलापूरकडे जाणारी वाहने अकलुज-टेभुर्णी या पर्यायी मार्गाने जातील. सोलापूर येथुन पंढरपूर मार्गे अकलुजकडे जाणारी वाहने सोलापूर-टेंभुर्णी-अकलुज या पर्यायी मार्गाने जातील.
सदरचा आदेशाचा अंमल हा दिनांक 9 जुलै 2024 रोजी 00.01 वा. पासुन ते 18 जुलै 2024 रोजी 24.00 वा पर्यत अंमलात राहील.असेही आदेशात नमूद केले आहे.