करमाळा (सोलापूर) : स्वातंत्र्य दिनानिमित्त करमाळा पोलिस व महसूल प्रशासनाच्या वतीने आज (गुरुवार) दुपारी ४ वाजता तहसील परिसर येथून करमाळा तिरंगा रॅली निघणार आहे. यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. करमाळा शहरातून ही रॅली निघणार असून मोटरसायकलसह नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने तिरंगा रॅलीद्वारे एकतेचा संदेश द्यावयाचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.
करमाळा पोलिस व तहसीलच्या वतीने आज तिरंगा रॅली
