दुर्दैवी घटना! इर्शाळवाडीवर कोसळली दरड

Unfortunate incident A crack collapsed on Irshalwadi

रायगड : रायगड जिल्ह्यातील खालापूरमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळली आहे. यामध्ये चौघाजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यामध्ये ५० ते ६० जण डिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. काल दिवसभर जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे ही घटना घडली आहे. या गावात २०० ते २५० लोक आहेत.

पावसामुळे ही दुर्दैवी घटना घडली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. मदत कार्य करण्यासाठी एनडीआरफचे पथक येथे दाखल झाले आहे. मात्र पावसामुळे मदत कार्य करण्यास अडचण येत आहे. मदत कार्य करण्यासाठी गेलेल्या एनडीआरएफच्या एका जवानाला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे. या घटनेतून १० व्यक्तींना वाचवण्यात यश आले आहे. मुरबे धरणाच्या जवळ ही घटना घडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *