करमाळा (सोलापूर) : बिटरगाव श्री येथील पांडुरंग वस्ती येथे नागपंचमीनिमित्त महिलांच्या विविध स्पर्धा झाल्या. नागपंचमीनिमित्त महिलांनी एकत्र येऊन पारंपरिक खेळ खेळण्याचा आनंद घेतला. काटवट खणा, लिंबू चमचा, संगीत खुर्ची, कबड्डी, खोखो, गीत गायन स्पर्धा, धावणे आदी स्पर्धा घेतल्या. यामध्ये विजेता महिलांना बक्षीस देण्यात आले. सर्व महिलांनी महिलांसाठी हे कार्यक्रम घेतले. नागपंचमीच्या निमित्ताने एकत्र येत महिलांनी हे कार्यक्रम घेत आनंद घेतला. या पारंपरिक खेळांमुळे बालपणीच्या आठवणीना उजाळा मिळाला. झिम्मा- फुगडी, घोडा- चुईफुई, पिंगा- काटवटकाना, पिंगा इत्यादी खेळ मनसोक्त खेळत उखाणे, गाणी म्हणून महिलांनी आंनद घेतला. या दिवशी महिला वर्तुळाकार आकार तयार करून झिम्मा- फुगडीसारखी नृत्ये व खेळ सादर केले.
पांडुरंग वस्ती येथे नागपंचमीनिमित्त महिलांच्या विविध स्पर्धा
