करमाळा (सोलापूर) : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या वर्धापन दिनानिमित्त वसंत हंकारे यांचे करमाळा येथील विकी मंगल कार्यालय येथे ‘न समजलेले आई- बाप’ या विषयावर व्याख्यान झाले. ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. महेश निकत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षाचा बक्षीस वितरण सोहळाही झाला.
यामध्ये सावडी येथील जयदीप एकाड, चिखलठाण येथील अकताब सय्यद, मांगी येथील हर्षदा जमदाडे, करमाळा येथील गौरी गाडेकर, जेऊर येथील शंभुराजे घोरपडे, सिद्धांत धोकाटे, कुंभेज येथील साक्षी मिसाळ, शौर्य शिंदे, तेजस्विनी काऊले, अजिंक्य शिंदे, सुरज शिंदे आदींना पारितोषक देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे माण येथील अभयसिह जगताप, टायगर ग्रुपचे तानाजी जाधव, माजी प्राचार्य जयप्रकाश बिले, माजी उपसभापती दत्तात्रय सरडे, डॉ. रोहन पाटील, डॉ. आशुतोष कापले, आरपीआयचे युवक अध्यक्ष यशपाल कांबळे, मनसे तालुकाध्यक्ष संजय घोलप, प्रा. नागेश माने, प्रकाश लावंड, माजी नगरसेवक अतुल फंड, विनय ननवरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, प्रा. लक्ष्मण राख उपस्थित होते. प्रा नंदकिशोर वलटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.