Birth Anniversary of Mahatma Phule at Sambhaji Brigade Liaison Office at Jeur

करमाळा (सोलापूर) : जेऊर येथे संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सोमनाथ जाधव म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई हे समाज क्रांतिकारक होते. महात्मा फुले यांचे सामान्य माणसावर प्रेम होते. त्यांनी सारे जीवन वंचितांसाठी वाहिले. या देशातील दिन दुबळ्यांसाठी आपले अवघे जीवन देणाऱ्या ज्योतिराव फुले या महापुरुषाला महात्मा या पदवीने गौरवण्यात येत आहे व अज्ञानाच्या अंध कारातून ज्ञानाचा तेजस्वी प्रकाश दाखवा. गरीब अस्पृश्य शोषित पीडित दिन दुबळ्या बहुजन समाजातील जनतेमध्येक्रांतीची ज्वाला पेटवून अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची प्रेरणा देऊन त्यांच्या मनात जागृत करणारा होता.

समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणारे, भेदाभेद, अस्पृश्यता, सती, बालविवाह सारख्या कर्मठ रूढी परंपरा व अंधश्रद्धांना विरोध करत कायम एकात्मतेचा, मानवतेचा विचार रुजवणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन चरित्रावर विचार मांडले. यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके, निलेश पाटिल, अतुल निर्मळ, बाळासाहेब तोरमल, सागर बनकर, हेमंत शिंदे, सोमनाथ जाधव, आदिनाथ माने, किशोर कदम, सचिन गारुडे, अजित उपाध्ये, धन्यकुमार गारुडी, संतोष पंडित, अविनाश घाडगे, गणेश मोरे आदी उपस्थित होते.

Discussion in the political circles on Mohite Patil entry into the Madha Lok Sabha constituency

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *