करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका ग्रामपंचायत कामगार युनियनची कार्यकारणी बरखास्त करण्यात आली असून नवीन पदाधिकारी निवडी होईपर्यंत कुंभेज ग्रामपंचायतचे कर्मचारी उमेश पवळ यांची महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत जिल्हा परिषद, नगरपालिका कामगार युनियन शाखा करमाळा तालुकाध्यक्ष पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे, असे जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव यांनी जाहीर केले आहे.
जाधव म्हणाले, करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांचे बँक खाते कन्वर्ट करणे, दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी करून सरकारकडे पाठपुरावा करणे, कर्मचाऱ्यांचा विमा काढणे, राहणीमान भत्ता, प्रायव्हेट फंडाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर ग्रामपंचायत वरून जमा करणे आधी प्रश्नबाबत आम्ही लवकरच करमाळा तालुका गटविकास अधिकारी यांच्यासोबत बैठक लावून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष जाधव यांनी सांगितले.
करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक भविष्य निर्वाण निधी व राहणीमान भत्ता, रजा याबाबत जिल्हाध्यक्ष जाधव यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात लवकरच नवीन कार्यकारणी तयार करून एक चांगली प्रामाणिक संघटना करमाळा तालुक्यात कामकाज करणार आहे. यांच्या नेतृत्वाखालीच तालुक्यातील कर्मचाऱ्याला एक संघ ठेवून एकत्रित लढा देऊन काम करणार आहे, असे नूतन तालुकाध्यक्ष उमेश पवळ यांनी सांगितले आहे.