Honoring women on the occasion of Balasaheb Thackeray birth anniversary in Karmala

करमाळा (सोलापूर) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त युवा सेनेच्या वतीने किल्लावेस येथे जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी देवळालीच्या सरपंच अश्विनी शिंदे, आदर्श शिक्षिका अंजली निमकर, कळसूबाई शिखर सर करणारी सहा वर्षाची बालिका अनन्या पवार यांचा शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. युवा सेनेचे शहर प्रमुख विशाल गायकवाड व युवा नेते प्रफुल्ल शिंदे यांनी नगरपालिका शाळाअंतर्गत वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.

कार्यक्रमासाठी शिवसेना तालुका प्रमुख देवानंद बागल, युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, महिला उपतालुका प्रमुख शामल रंदवे, वरकटणे ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब तनपुरे, पुष्पा शिंदे, प्रशांत शिंदे, पत्रकार विशाल घोलप, अशोक मुरूमकर, उद्योजक आकाश सिंधी, अविनाश भिसे, सिकंदर फकीर, वासुदेव ढोके, लखन ननवरे, केशव साळुंखे, प्रमोद कांबळे आदी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *