विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना अभिवादन

करमाळा (सोलापूर) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे डॉ. आंबेडकरवादी चळवळ व सामाजिक संघटना यांच्या वतीने आज (रविवार) राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. एल. यु. कांबळे, सुरेश आहेर, महेश इरकर, सनि कांबळे, अजहर जमादार यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हे अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. आंबेडकरवादी चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *