Bitargaon s got ST stand due to MLA Sanjaymama Shinde

करमाळा (सोलापूर) : करमाळा व कुर्डुवाडी नगरपरिषद हद्दीतील विविध विकासकामांसाठी नगरविकास खात्याकडून १५ कोटी तर पर्यटन व सांस्कृतिक खात्याकडून करमाळा तालुक्यातील संगोबा, शेटफळ (नागोबाचे), चिखलठाण येथील देवस्थान परिसर विकासकामी ३ कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

यामध्ये करमाळा पालिका हद्दीतील महात्मा फुले चौक पुतळा ते जि.प.विश्रामगृह रस्ता मजबुतीकरण व स्ट्रीट लाईट बसविणे – १५० लाख, दत्त मंदिर(विकासनगर) ते नवीन न्यायालयीन इमारत रस्ता, मेनरोड व शहराअंतर्गत रस्त्यांवर स्ट्रीट लाईट बसविणे – ४०लाख, आय.सी.आय.सी.आय बँक ते जुनी लाकडी मिल फंड गल्ली (जुना बायपास) रस्ता मजबुतीकरण करणे -१५० लाख, पालिका हद्दीत अभ्यासिका बांधणे -५०लाख, गट नं.३७८ कत्तलखाना रोड (जुना नगर रोड) बेग फकीर दफनभूमी वॉल कंपाऊंड बांधणे -३० लाख, माजी सैनिक कारगिल भवन कंपाऊंड वॉल व सुशोभीकरण करणे -३०लाख, राज्यमार्ग ६८ ते अण्णासाहेब हायस्कूल रस्ता मजबुतीकरण करणे – १०० लाख, दुधे डायगणोस्टिक सेंटर ते अण्णासाहेब हायस्कूल रस्ता मजबुतीकरण करणे -५० लाख तर कुर्डुवाडी पालिका हद्दीतील टेम्भुर्णी रोडवरील बेंद ओढ्यावरील पूल बांधणे -९०लाख, करमाळा रोड येथील संजयमामा शिंदे विद्यालय ते ब्रीच कॉर्नरपर्यंत कॅनॉल गटार बांधणे-१२०लाख, पाणीपुरवठा केंद्र येथे सौरऊर्जा पॅनल बसविणे-२००लाख, कुर्डुवाडी शहरात आवश्यक त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसविणे-८० लाख, राजमाता अहिल्यादेवी पुतळा परिसर सुशोभीकरण करणे-४० लाख लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर सुशोभीकरण करणे-४०लाख, पालिकाहद्दीत आवश्यक त्या ठिकाणी काँक्रीट रस्ते करणे-२००लाख, माढा रोडवरील व्यापारी गाळे नूतनीकरण करणे- १३० लाख अशी कामे मंजूर करण्यात आली आहेत.

पर्यटन व सांस्कृतिक विभागामार्फत करमाळा तालुक्यातील बोरगाव येथील श्री आदिनाथ देवस्थान (संगोबा) येथे घाट बांधणे-९०लाख, शेटफळ (नागोबाचे) येथील नागनाथ देवस्थान कल्लोळ तलावास पायऱ्या बांधणे-९० लाख, शेटफळ गावठाण ते नागनाथ देवस्थान पोहोच रस्ता व मोरी बांधणे-२०लाख, चिखलठाण -१ येथील कोटलिंग देवस्थान पोहोच रस्ता व स्ट्रीट लाईट बसविणे-१००लाख असा निधी मंजूर झाला. आमदार शिंदे यांच्या प्रयत्नशील विकासदृष्टीमुळे आत्तापर्यंत मतदारसंघातील सर्वच गावांतील विविध विकासकामे व योजनांना कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून अनेक विकासकामे मार्गी लागली असल्याने मतदार-जनतेमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून संजयमामांच्या राजकारणविरहित सर्वांगीण विकास या कार्यपद्धतीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *