करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया सुरु आहे. जेऊर, कोर्टी, केम, चिखलठाण, राजुरी, कावळवाडी, भगतवाडी, घोटी, गोंडरे, कंदर, निंभोरे, केत्तूर, रामवाडी, रावगाव व वीट या ठिकाणी सरपंच पदासह ग्रामपंचायत सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्या नियंत्रणाखाली ही निवडणूक प्रक्रिया सुरु असून पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
तालुक्यात १५ ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया सुरु
