करमाळा (सोलापूर) : ‘आदिनाथ कारखान्याच्या अनेक निवडणुका झाल्या परंतु ही निवडणुक कारखान्याच्या अस्तित्वाची असल्याने सभासदांवर सुध्दा एक जबाबदारी आहे’, असे सांगुन ‘मतदार कारखाना विकणाऱ्यापेक्षा कारखाना वाचणाऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील’, असा विश्वास आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त केला.
श्री आदिनाथ कारखाना संजिवनी पॅनलची प्रचार सभा कविटगाव येथे झाली. आमदार पाटील म्हणाले, ‘आदिनाथ कारखाना हा या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरेल या उद्देशाने कर्मयोगी गोविंदबापु पाटील यांनी या कारखान्याची उभारणी केली. आज हा उद्देश सफल करण्यासाठी आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत. भविष्यात कारखाना उर्जित अवस्थेत आणुन या ठिकाणी बायप्राॅडक्ट तयार करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर दिला जाईल.’