करमाळा (सोलापूर) : मध्य रेल्वेच्या मुंबई- चेन्नई मार्गावरील पारेवाडी स्थानकावर एक्सप्रेस गाडीचा थांबा मिळाला आहे. हा थांबा मिळाल्याबद्दल हिरवा झेंडा दाखवून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत गाडीचे स्वागत करण्यात आले.
पारेवाडी स्थानकावर एक्सप्रेस गाडीला थांबा मिळावा यासाठी केत्तुरसह परिसरातील गोयेगाव, वाशिंबे, राजुरी, सोगाव, हिंगणी, पारेवाडी, पोमलवाडी, खातगाव, भगतवाडी- गुलमरवाडी, देलवडी, कुंभारगाव, दिवेगव्हाण, सावडी, टाकळी, रामवाडीने लोकसभेच्या निवडणुकीत बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. याशिवाय रेल रोकोचा इशारा दिला होता.
खासदार निंबाळकर यांनी चेन्नई सुपर मेल पारेवाडी रेल्वे स्थानकावर थांबावी म्हणून प्रयत्न केले. तत्पुर्वी पुणे ते हरंगुळ/ लातुर या एक्सप्रेस गाडीचा थांबा देण्यात आला आहे. ॲड. अजित विघ्ने, देवराव नवले, उदयसिंह पाटील, सुर्यकांत पाटील, संदिप काळे, मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल, जगताप गटाचे शंभुराजे जगताप, दादा येडे यांनी कार्यक्रमावेळी मनोगत व्यक्त केले.
भाजपाचे जिल्हा अध्यक्ष चेतन केदार- सावंत, सरचिटणीस गणेश चिवटे, माजी सभापती बापूसाहेब पाटील, जिल्हा दुध संघाचे संचालक राजेंद्रसिंह पाटील, सतिश शेळके, नागनाथ लकडे, अनिल गलांडे, प्रा. सुहास गलांडे, मनोहर हंडाळ, विशाल सरडे, नवनाथ गायकवाड, सचिन वेळेकर, प्रशांत नवले, हरिश्चंद्र खारमोडे, रामदास गुंडगिरे, महादेव नवले, सुनील ढवळे, अशोक ढवळे, शिवाजी चाकणे, डॉ. तारसे, डॉ. गुळवे, लक्ष्मण महानवर आदी यावेळी उपस्थित होते.