करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरु आहे. या निवडणुकीत दाखल झालेल्या अर्ज मागे घेण्यासाठी २६ तारखेपर्यंत मुदत आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. यासाठी राजकीय घडामोडीही वेगाने सुरु आहेत. परंतु सर्वसामान्य व्यक्तींच्या मनात या निवडणुकीबाबत नेमके काय मत आहे. हा प्रश्न आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणे आवश्यक आहे का? हा प्रश्न घेऊन ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलकडून ऑनलाईन सर्व्हे सुरु आहे. या सर्व्हेमध्ये जास्तीजास्त नागरिकांनी मत नोंदवावे. या सर्व्हेमध्ये नागरिकांच्या मनात नेमके काय आहे हे पाहिले जाणार आहे.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी जगताप, बागल, शिंदे व पाटील गटाच्या समर्थकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील शिंदे गटाच्या १० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. बागल आणि पाटील गटाच्या भूमिकेसाठी अकलूजमध्ये निर्णय होणार असल्याचे समजत आहे. याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र नागरिकांच्या मनात या बाबत काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘काय सांगता’कडून केला जात आहे. या सर्व्हेचे वास्तव २४ तासानंतर आपल्यासमोर मांडले जाणार आहे.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होणे आवश्यक आहे का?