करमाळा (सोलापूर) : शहरातील तेली गल्ली येथील सहकार युवक मित्र मंडळच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त शुक्रवारी (ता. २२) भव्य रक्तदान शिबिर होणार आहे. शुक्रवारी सकाळी 9 ते 5 यावेळेत संताजी जगनाडे महाराज समाज मंदिर तेली गल्ली येथे हे रक्तदान शिबीर होणार असून यामध्ये जास्तीतजास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन गणेशोत्सव मंडळाने केले आहे. सहकार युवक मंडळ हे दरवर्षी गणेशोत्सवात सामाजिक उपक्रम राबत असते. त्यातूनच हा उपक्रम राबवला जात आहे.
