करमाळा (सोलापूर) : जेऊर- आष्टी रेल्वे मार्गाला निधी उपलब्ध करून काम सुरु करावे यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी जेऊर प्रवासी संघटनेने भाजपचे आमदार राम शिंदे यांच्याकडे न निवेदनाद्वारे केली आहे. जेऊर- आष्टी मार्गाचा अंतिम सर्व्हे झाला असून त्याला निधी उपलब्ध करून काम करण्यात यावे अशी मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुहास सूर्यवंशी, उपाध्यक्ष प्रवीण करे, बाळासाहेब गरड, अल्लाउद्दीन मुलानी, डॉ, भिसे, दादासाहेब थोरात, संतोष वाघमोडे, प्रमोद जानकर, सुनील अवसरे, संतोष पिसे, अमोल वाकसे व अशोक सुरवशे उपस्थित होते.
जेऊर आष्टी रेल्वे मार्गाचा फायनल सर्वे पूर्ण झाला असून 2023- 24 वर्षात एक हजार निधी देण्यात आला आहे. जेऊर ते आष्टी रेल्वे मार्ग हा 78 किलोमीटरचा असून यासाठी नियोजित रक्कम 1560 कोटीची तरतूद केली आहे.
जेऊर ते आष्टी रेल्वे मार्गाची वैशिष्ट्ये
- जेऊर – करमाळा – चौंडी – आष्टीला जोडणारा हा मार्ग असणार आहे.
- जेऊर- आष्टी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास करमाळा शहरात रेल्वे स्थानक होणार असून कमलाभवानी मंदिरास पर्यटनास चालना मिळणार.
- जेऊर ते आष्टी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास चौंडी येथे रेल्वे स्थानक होणार आहे. त्यामुळे आपणा सर्वांचे चौंडी येथे असणारे श्रद्धास्थान अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थानी भेट देण्यासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांना येण्या जाण्यासाठी सोयीचे ठरणार आहे.
- जेऊर आष्टी रेल्वे मार्ग चालू झाल्यास आपणा सर्वांचे श्रद्धास्थान असणारे अहिल्यादेवी होळकर यांचे (माहेर चौंडी ते इंदोर सासर) असा रेल्वे मार्ग असणार आहे व त्या मार्गावर थेट रेल्वे धावतील.
- जेऊर ते आष्टी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास दक्षिण भारताकडून येणाऱ्या व उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वे भविष्यात या मार्गाने धावतील.
- जेऊर ते आष्टी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास करमाळा व कर्जत तालुक्यातील प्रवाशांसाठी प्रवास व दळणवळण आणखीन सुलभ होणार आहे. त्यामुळे या दोन तालुक्यातील विकासाला व आर्थिक परिस्थितीला चालना मिळणार आहे.
- जेऊर ते आष्टी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास जेऊर स्थानकास जंक्शन चा दर्जा प्राप्त होणार आहे त्यामुळे भविष्यात या स्थानकावर जवळपास सर्व रेल्वे गाड्यांना थांबा मिळेल त्यामुळे जेऊर शहर हे दळणवळणासाठी फार उपयोगी ठरणार असून करमाळा, जामखेड, परंडा, या तीन तालुक्यातील प्रवासी व नागरिक येथून पूर्ण भारतभर देशात प्रवास करण्यासाठी या स्थानकाचा उपयोग करतील.