करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील केम ग्रामपंचायत निवडणुकीत अजित तळेकर यांचे पारडे सध्या तरी जड असल्याचे बोलले जात आहे. येथे सरपंचपदासाठी दुरंगी लढत होत असून प्रचाराचे योग्य नियोजन आणि मतदारांचा विश्वास यामुळे तळेकर यांच्या पॅनलचा विजय होईल, अशी चर्चा आहे. शिवशंभो पॅनेल व श्री. उत्तरेश्वर युवा परिवर्तन पॅनेलमध्ये येथे लढत होत असून शिवशंभो पॅनेलचे नेतृत्व अजित तळेकर करत आहेत.
करमाळा तालुक्यातील केम ग्रामपंचायत सर्वात मोठी आहे. येथे दुरंगी लढत होत असून अजित तळेकर यांच्या पॅनलविरुद्ध श्री. उत्तरेश्वर युवा परिवर्तन पॅनेल अशी लढत होत आहे. ही निवडणूक लक्षवेधी होणार आहे. तळेकर यांना रोखण्यासाठी त्त्यांच्याविरोधातील सर्व कार्यकर्ते एकत्र आले आहेत. त्यांच्याविरोधात असलेल्या पॅनलच्या प्रचारासाठी गर्दी होत आहे हे खरे आहे मात्र त्याचे मतात रूपांतर होणे आवश्यक आहे. येथे प्रत्यक्षपणे बोलत नसलेला मतदार काय करतो यावर बरेच अवलंबून राहणार आहे. विजय कोणाचा होईल हे आता सांगता येत नसले तरी मताधिक्य घटू शकते, अशी चर्चा येथे आहे.
केम ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दोन्ही गटाकडून प्रचार सुरु झाला आहे. ही निवडणूक चर्चेची ठरणार आहे. श्री. उत्तरेश्वर युवा परिवर्तन पॅनेलकडून 17 उमेदवार रिंगणात उतरले असून त्यातील 13 उमेदवार हे तरुण आहेत. या पॅनेलमधील 6 उमेदवार हे तळेकर आडनावाचे आहेत. शिवशंभो पॅनेलमध्ये 5 उमेदवार हे तळेकर आडनावाचे आहेत. केम ग्रामपंचायतची निवडणूक ही श्री उत्तरेश्वर युवा परिवर्तन पॅनल विरुद्ध शिवशंभू पॅनल आशी आहे.