Video : करमाळ्याचा सर्वांगीण विकास करणार : शिवसेनेच्या उमेदवार नंदिनी जगताप यांचा सर्व मूलभूत प्रश्न सोडविण्याचा मानस

करमाळा (अशोक मुरूमकर) : आम्ही केलेल्या कामांमूळे ही निवडणुक निश्चीतपणे जिंकु हा मला आत्मविश्वास आहे. पदावर विराजमान झाल्यानंतर आमचे नेते संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारकडून जास्तीत जास्त निधी मिळवून जाहीरनाम्यात दिलेल्या विकास कामावर भर देवू, असे शिवसेनेच्या (शिंदे गट) नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नंदिनी जगताप यांनी ‘काय सांगता’शी बोलताना सांगितले आहे.

जगताप म्हणाल्या, ‘शहरातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण यामूलभूत सुविधा व जनउपयोगी योजना सरकारकडे पाठपुरावा करून सर्व प्रश्न मार्गी लावले जातील. सुमारे ७२ कोटीचे शहरांतर्गत रस्ते, नगरपरिषदेची प्रशासकीय इमारत, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणे, भूयारी गटारे, एसटीपी योजनेतंर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, केबलद्वारे व अंडरग्राऊंड वीज, चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे या कामांना प्राधान्य राहील.’

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘शहरात सांस्कृतिक गरज पूर्ण व्हावी यासाठी भव्य सांस्कृतिक भवन उभारण्याचा माझा मानस आहे. करमाळा शहर स्वच्छ अन् सुंदर कसे राहील याकडे विशेष लक्ष ठेवीन. नगरपरिषदेच्या अंतर्गत असलेल्या शाळा अत्याधुनिक दृक-श्राव्य साधनांसह जास्तीत जास्त डिजीटल बनवण्याचा प्रयत्न राहील. आरोग्य सुविधांमध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा, नगरपरिषदेमार्फत मोफत रुग्णवाहिका, आरोग्य केंद्रात प्रसुती सुविधा, मातृत्व व बालकेंद्र सुरु करण्यात येईल. प्रशासनात सर्व विभाग डिजीटल करून पारदर्शक कारभार केला जाईल.’

‘बहुउद्देशीय सभागृहे, जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा कट्टे, मिनी ग्रीन पार्क, पथदिवे, व्यायाम शाळा, अभ्यासिका, तक्रार निवारण केंद्र, जॉगींग ट्रॅक, ट्राफीक नियंत्रणासाठी एकेरी मार्ग, पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. महिला बचत गटांना लघू उदयोग, गृह उदयोग यांना प्रोत्साहन दिले जाईल. देशभक्त कै. नामदेवराव जगताप क्रिडा संकुलात भव्य स्पोर्टस् क्लब सुरु करू. आठवडा बाजारासाठी वाढीव जागा उपलब्ध करून दिली जाईल’ असे आश्वासन जगताप यांनी दिले. ‘लाडकी बहीण योजना’, ‘आवास योजना’ आदी प्रभावीपणे राबवले जातील.

‘भूईकोट किल्ल्याची डागडुजी, ओढ्या, नाल्यांच्याकडेला पळझाडे लावण्यात येतील. सार्वजनीक शौचालये, मुताऱ्या विवीध भागात बांधण्यात येतील. सर्व प्रकारच्या दाखल्यांसाठी ‘एक खिडकी योजना’ राबविली जाईल’, असे जगताप म्हणाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *