करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदार संघात भाजपने पहिल्याच यादीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर निंबाळकर यांनी मतदारसंघात जोरदार प्रचारही सुरु केला मात्र त्यांच्याबाबत नाराजी असल्याचे लोक आता उघडपणे बोलू लागले आहेत. त्यांच्याविरुद्ध कोण रिंगणात असणार हे महाविकास आघाडीने अजून जाहीर केले नसले तरी निंबाळकरांवर मात्र नाराजी असल्याचे चित्र दिसत आहे. ही नाराजी निंबाळकर कशी दूर करतील हे पहावे लागणार आहे.
माढा लोकसभा मतदार संघात २०१९ च्या निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे व खासदार निंबाळकर यांच्यात लढत झाली होती. यामध्ये निंबाळकर विजयी झाले. निंबाळकर यांना 5 लाख 86 हजार 314 तर आमदार शिंदे यांना 5 लाख 550 मते मिळाली होती. त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. गेल्यावेळीचे एकमेकांचे विरोधक आता एकत्र आले आहेत. आता आमदार शिंदे यांनी निंबाळकर यांना पाठींबा दिला आहे. निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी महायुतीकडून प्रचारही सुरु झाला आहे. महाविकास आघाडीचा कोण उमेदवार असेल याची उत्सुकता आहे.
खासदार निंबाळकर यांनी गेल्यावेळी विजयी झाल्यानंतर फक्त ठराविकच नेत्यांना जवळ केले असा आरोप केला जात आहे. विकास निधीही देताना सर्वसामान्य नागरिकांना विचारात घेतले नाही अशी तक्रार केली जात असून त्यांच्यावर नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. खासदार निधीतून देण्यात आलेले दिवे सुद्धा मनमानीपणे राजकारण करत उभारले आहेत. गावातील सर्वांगीन विकास करताना लहानलहान गोष्टीत स्थानिक नेत्यांनी राजकारण केले असल्याची चर्चा त्याचा फटका निंबाळकर यांना बसू शकतो.
पाच वर्षात खासदार निंबाळकर हे इतर खासदारांच्या तुलनेत नक्कीच जास्त जनसंपर्कात होते हे वास्तव आहे. मात्र हा जनसंपर्क त्यांनी फक्त ठराविकच नेत्यांशी ठेवला असा आरोप करून त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात हं . करमाळा तालुक्यात भाजपने बागल गटाला जवळ केले आहे, मात्र त्यांच्याच कारखान्याकडे शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल आहे. हे बिल अद्याप मिळाले नसून त्यावरूनही खासदार निंबाळकर यांना प्रश्न केला जात आहे. खासदार निंबाळकर यांच्याबरोबर नेते आहेत हे वास्तव आहे. मात्र त्यांच्यावर मतदारांमध्ये नाराजी असल्याचे चित्र दिसत आहे.
जिथे हुलगे पिकत नव्हते तेथे आता ‘सोनं’ पिकतय… आता मामा म्हणतील तसंच करणार, खासदार निंबाळकरांसमोर पदाधिकार्यांनी व्यक्त केली भावना
रविवार व सोमवारी निंबाळकर यांनी करमाळा व टेंभुर्णी येथे पदाधिकऱ्यांचा भेटी घेतल्या. रविवारी बागल यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यानंतर सोमवारी आमदार शिंदे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. आमदार शिंदे यांच्या कार्यालयातील बैठकीनंतर काही शेतकऱ्यांनी थेट निंबाळकर यांची भेट घेऊन बागल यांच्याबाबत प्रश्न करत कारखान्याच्या थकीत ऊस बिलाबाबत नाराजी व्यक्त केली. ‘तुम्ही पाच वर्षात आम्हाला डावलले मात्र तरीही आमदार शिंदे सांगतील तेच आम्ही ऐकणार आहोत,’ असे आमदार शिंदे समर्थक म्हणत आहेत.
करमाळा तालुक्यातील प्रश्न मार्गी लावणार असल्याचे खासदार निंबाळकर यांचे आमदार शिंदे यांच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही अनेक पदाधिकारी नाराज आहेत. आम्हाला खासदार निंबाळकर हे डावलत आहेत, असा त्यांचा आरोप आहे. महायुतीचा प्रोटोकॉल म्हणून आम्ही समोर येत नाही मात्र आम्हाला विचारत घेतले नाही तर मत पेटीतून उत्तर देऊ असे ते खासगीत बोलताना म्हणत आहेत. मोहिते पाटील यांनी अजून भूमिका मांडलेली नाही, त्यांनी उमेदवारीबाबत भूमिका मांडल्यानंतर या मतदार संघात वेगळे चित्र दिसू शकते मात्र सध्य स्थितीत खासदार निंबाळकर यांच्यावरील नाराजी असचे उघडपणे बोलले जात आहे. याचा काय परिणाम होणार हे निकालातच समजेल मात्र ही नाराजी निंबाळकर कशी दूर करतील हे पहावे लागणार आहे.
Video : रामराजे निंबाळकरांबाबत अजित पवार निर्णय घेतील
करमाळ्यात काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये सुद्धा दोन गट होते. मोहिते पाटील समर्थक सोडून हे दोन गट होते. मात्र आता मोहिते पाटील यांची भूमिका स्पष्ट नसल्याने मोहिते पाटील समर्थक सोडून भाजपमधील पदाधीकारी एकत्र काम करत असताना दिसत आहेत. ते निंबाळकर यांना विजयी करणारच असे सांगत आहेत.
महाविकास आघाडीच्या उमेदवाराला करमाळा तालुक्यातून मताधिक्य देणार : संतोष वारे