मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाला महत्व देत आम्ही शिंदे व फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. विरोधी पक्षाची जेव्हा बैठक झाली त्यात आउटफूट काहीही निघालेले नाही. शुक्रवारी मी विरोधी पक्षपदाचा राजीनामा दिला होता, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
यावेळी मंत्री छगन भूजबळ, प्रफुल पटेल, धनंजय मुंडे आदी उपस्थित होते. तरुणांना संधी देणे व इतर मुद्द्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. टीकाटिपणीला फार महत्व न देता आम्ही काम करत राहणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे. बहुतेक सर्व आमदारांना हा निर्णय मान्य असून पुढे राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच आम्ही काम करत राहणार आहोत. येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे चिन्ह घेऊनच आम्ही लढणार आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे. (पत्रकार परिषद अजून सुरु आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी रिफ्रेश करा)