करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील गावांना पुणे जिल्ह्याला जोडण्यासाठी वरदान ठरलेल्या ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाचा नुकताच भराव खचला आहे. तो पूल प्रशासनाने वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. या पुलाची पाहणी भाजपचे प्रा. रामदास झोळ यांनी केली आहे.
पुढे बोलताना प्रा. झोळ म्हणाले, ‘पश्चिम भागातील गावांना पुणे, भिगवन व बारामतीला जोडणारा डिकसळ पुल हा एकमेव मार्ग आहे. त्याचा भराव खचल्याने प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचे व रुग्णांची गैरसोय होता आहे. त्यामुळे भविष्यातील धोका लक्षात घेऊन पूर्णपणे विचार करून यावर काही तात्पुरता मार्ग काढता येतोय का तसेच नवीन पुलाचे काम बंद असल्याच्या कामासंदर्भात आपण लवकरच पालकमंत्र्यांना भेटून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.’