करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी रविवारी (ता. १८) सकाळी ८ वाजता सुरु होणार आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे निवडणुक निर्णय अधिकारी सोपन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणी होणार असून सहाय्यक म्हणून दिलीप तिजोरे व सहाय्यक विजयकुमार जाधव हे काम पाहत आहेत.

