करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील साठेनगर, भीम नगर, कानाड गल्ली भागातील त्वरित स्वच्छता करा, अशी मागणी दलित सेना महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष निलावती कांबळे यांनी केली आहे. स्वछता न केल्यास नगरपालिकेवर मोर्चा काढला जाणार आहे, असा इशारा त्यांनी आज नगरपालिकेसमोर बोलताना दिला आहे. करमाळा नगरपालिकेवर सध्या प्रशासक आहेत. त्यामुळे स्वछतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
