करमाळा (सोलापूर) : मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून त्याच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. या सुनावणीवेळी बागलविरोधी गटाच्या अपात्र ठरविण्यात आलेल्या उमेदवारांनी ऊस गाळप संदर्भात आमचे अर्ज अपात्र ठरवले आहेत. मात्र छाननीवेळी आम्हाला थकबाकीचे कारण देण्यात आले होते. तेव्हा उसाबाबत म्हणणे सादर करण्यात वेळ देण्यात आला नव्हता, असे सांगितले असून शुक्रवारी याबाबत पुन्हा सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या आहे.
करमाळा येथे सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांच्यापुढे पुन्हाही सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी युक्तीवादावेळी न्यायालयापुढे वकिलांनी केली आहे, असे सांगितले जात आहे. त्यामुळे या निकालात काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान बागलविरोधी गटाचे प्राध्यापक रामदास झोळ, माया झोळ, सुभाष शिंदे यांच्यासह अपील केलेल्या उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी करमाळा यांच्याकडे हा निकाल आमच्या बाजूने लागेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या पॅनलमधील चार उमेदवारांनी जे चिन्ह घेतले आहे ते चिन्ह विमान हे आम्हाला मिळावे, अशी मागणी केली आहे याबाबत त्यांनी तसे पत्रही दिले आहे. यामध्ये निकाल काय येतो यावर हे ठरणार आहे.