मुलगा व पती पावसात बैलगाडीत होते तर ‘ती’ माऊली त्यांच्या मागे चालत होती, मात्र तेव्हाच तिच्या अंगावर वीज कोसळली अन्… गुळसडीवर शोककळा

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील गुळसडी येथे अंगावर विज कोसळल्याने एक महिला ठार झाली आहे. कमल सुभाष अडसुळ (वय ४५) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. करमाळा शहर व तालुक्यात काही ठिकाणी रविवारी (ता. ४) दुपारी पाऊस झाला.

रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास गुळसडी येथे विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. त्यात अडसुळ वस्ती येथे पाऊस झाला. शेतात काम करत असताना पाऊस सुरु झाला. त्यामुळे बैलगाडीने ते घरी येत होते. मुलगा व पती हे गाडीत होते तर ठार झालेल्या कमल या पावसात गाडीमागे चालत होत्या. घर काही अंतरावर आले असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली त्यात त्या जागेवरच ठार झाल्या. त्यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली व पती असा परिवार आहे.

त्यानंतर त्यांना खासगी गाडीने करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय अडसुळ यांच्या त्या चुलत भावजयी होत्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *