करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘तु आमच्या रानात येईचे नाही’, असे म्हणत अश्लील शब्द वापरून लजस्पद स्पर्श करत महिलेला ढकलून दिल्याचा प्रकार वंजारवाडी (कुराणवाडी) येथे घडला आहे. याबाबत दीर व जाऊ विरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ११ तारखेला सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
वंजारवाडी (कुराणवाडी) येथे फिर्यादी महिला शेतातून सरपण घेऊन घरी आली. तेव्हा गुन्हा दाखल झालेला संशयित आरोपी फिर्यादी महिलेचा दीर त्यांच्याजवळ आला व म्हणाला ‘तु आमच्या रानातून येईचे नाही.’ अश्लील शब्द वापरून लज्जास्पद स्पर्श करत त्यांना ढकलून दिले. तेव्हा संशयित आरोपीची पत्नी घराबाहेर आली व तिनेही शिवीगाळ केली. ‘तु आमच्या शेतातून का आलीस? पुन्हा जर आमच्या शेतातून आली तर जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी महिलेचे पती घराबाहेर आले. त्यानंतर त्यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे.