करमाळ्यात आज महिला अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने महिला सन्मान रॅली

Women Respect Rally organized by Women Atrocities Action Committee today in Karmala

करमाळा (सोलापूर) : करमाळ्यात आज (गुरुवार) महिला अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने महिला सन्मान रॅली काढण्यात येणार आहे. देशात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ ही रॅली काढण्यात येणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता श्री. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून ही रॅली निघणार असून दत्त पेठ, गुजर गल्ली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गायकवाड चौक, महात्मा फुले पुतळा मार्गे तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांना निवेदन देऊन रॅलीची सांगता होणार आहे. यामध्ये मोठ्या संख्येने महिला, युवती यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ऍड. सविता शिंदे व एलिझाबेथ असादे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *