सोलापूर : आर्थिक गैरव्यहवाराचे फॉरेन्सिक अकाउंटींग करणे महत्वाचे असते आणि जगातील पहिला फॉरेन्सिक अकाऊंटंट म्हणून चाणक्यची ओळख आहे, असे ‘आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग’ या पुस्तकाच्या लेखिका अपूर्वा जोशी यांनी सांगितले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने लोकमान्य टिळक सभागृह अ‍ॅम्फी थिएटरमध्ये लेखिका जोशी यांची प्रकट मुलाखत झाली.

लाच लुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाच्या पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी ही मुलाखत घेतली. सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत यावेळी उपस्थित होते. देशात अनेक मोठे आर्थिक गैरव्यहावर उघडकीस आले. त्यावर अभ्यासपूर्ण तपास आणि त्याचे ऑडिट करण्याचे म्हणजेच फॉरेन्सिक अकाऊंटींग करण्याची जबाबदारी मिळाली त्यावरूनच या सर्व गैरव्यहावरचा आणि त्यामधील तपासाबाबत आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग नावाचे पुस्तक तयार करण्यात आल्याचे लेखिका डॉ. अपुर्वा जोशी यांनी सांगितले.

प्रत्येक गैरव्यहवाराचे ऑडिट करत असताना नवीन अभ्यास करूनच दिशा ठरवावी लागते. आर्थिक साक्षरता महत्वाची तसेच सायबर सतर्कताही आवश्यक आहे. असेही डॉ. अपूर्वा जोशी यांनी सांगितले. पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी अभ्यासपूर्ण आणि पोलिस दलात कार्यरत असताना केलेल्या तपासाच्या अनुभावावरून प्रश्‍न विचारले आणि त्याला तेवढ्याच अभ्यासपूर्णपणे अपूर्वा जोशी यांनी उत्तर दिले. काही प्रश्‍नांच्या उत्तराला उपस्थितीत नागरीकांनी भरभरून दाद दिली. कायद्याची अंमलबजावणी करताना आलेले अनुभव शमिर्र्ष्ठा वालावकर यांनी प्रश्‍नातून मांडले.

कायदे सक्षम आहेत परंतु इतर गुन्ह्यापेक्षा आर्थिक गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहेत. ही चिंतेची बाब आहे, असे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी केले. अविनाश महागांवकर यांनी लेखिका अपूर्वा जोशी, पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर आणि जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत यांचा परिचय करून दिला. त्यानंतर अध्यक्षा रेणुका महागांवकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन कोषाध्यक्ष अमोल धाबळे यांनी केले तर आभार कार्यवाह जितेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. मंच सजावट गुरू वठारे यांनी केली. यावेळी पृथा हलसगीकर अभय जोशी, विनायक होटकर, ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने, उद्योगपती दत्ताआण्णा सुरवसे, डॉ. शिवरत्न शेटे, दत्ता गायकवाउ, डॉ.श्रीकांत येळेगांवकर, डॉ. नसिमा पठाण आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *