करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात मुलींची संख्या घटली असून हा चिंताजनक प्रकार आहे. हे प्रमाण वाढावे म्हणून करमाळा उपजिल्हा रुग्णालय व करमाळा पंचायत समितीच्या वतीने गर्भनिदान करणाऱ्यांवर प्रतिबंधक उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. यासाठी एक पथक तयार करण्यात आले, असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. गुंजकर व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली आहे.

करमाळा पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी यांच्या कक्षात डॉ. गुंजकर व बीडीओ राऊत यांनी ही माहिती दिली आहे. करमाळा तालुक्यात मुलींची संख्या घटली आहे. मुलींची प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाकडून उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र बेकायदा गर्भनिदान करणे व असुरक्षित गर्भपात याचा मुलींचे प्रमाण कमी होण्यावर झाला, असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे यापुढे कायद्याची प्रभावी अमंलबजावणी केली जाणार आहे. बेकायदा गर्भनिदान करणाऱ्याची कोणाला माहिती समजल्यास संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

करमाळा तालुक्यात सध्या १००० मुलांमागे ८९८ मुली आहेत. साधारण हे प्रमाण १००० पुरुषांमागे ९५० महिला असे आवश्यक आहेत. मात्र कायद्याचा धाक नसल्याने व जनजागृतीचा अभाव यामुळे मुलीचे प्रमाण घटले आहे. याकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे. डॉ. गुंजकर म्हणाले, मुलींचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. बेकायदा गर्भनिदान केले जात असल्याचे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. यासाठी एक पथकही तयार करण्यात आले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, करमाळा शहरात १२ ते २० आठवडे दरम्यान गर्भपात करण्यासाठी पाच सरकारमान्य केंद्र आहेत, असेही त्यांनी सांगितले. बीडीओ राऊत म्हणाले, मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी पंचायत समितीकडून योग्य ती मदत केली जाणार असून जनजगृतीवर भर दिला जाणार आहे.