करमाळा (सोलापूर) : विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे धायखिंडी येथे आजपासून (शनिवार) 9 जानेवारीपर्यंत ‘श्रमसंस्कार शिबीर’ होणार आहे. ‘युवकांचा ध्यास, ग्राम व शहर विकास’ हे बिंद्र वाक्य घेऊन हे शिबीर होणार आहे, अशी माहिती प्रभारी प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने यांनी दिली आहे.
ZP Election Veet Gat : जे सत्ताधाऱ्यांना जमलं नाही ते केलं, पण आता मतात दिसणार का?
डॉ. माने म्हणाले, ‘शिबिराच्या माध्यमातून गावात वृक्षलागवड, जनावराचे लसीकरण, आरोग्य शिबीर, जलतारा प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, गांडूळखत, परसबाग, सेंद्रिय शेती, जलव्यवस्थापन, भूमीपुत्राचा सन्मान व हळदी कुंकुवाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. स्वच्छता अभियान ग्राम सर्वेक्षण अशा विविध व्याख्यानाच्या माध्यमातून ग्रामस्थाचे प्रबोधन केले जाणार आहे. सांस्कृतीक कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजन व प्रबोधन केले जाणार आहे. या शिबिरामध्ये शासनाचे विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या शिबिरामधून स्वंयमसेवक आणि ग्रामस्थ यांना वेगवेगळ्या व्याख्यानातून बहुमूल्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबीरासाठी संपूर्ण ग्रामस्थ सक्रिय सहभागी होणार आहेत.’
शिबार यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ विभागाचे प्रशासकीय अधिकारी संभाजी किर्दाक व राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख, प्रा. संजय पाटील, प्रा. मनोहर धिंदळे, प्रा. दिलीप थोरवे, प्रा. भाऊसाहेब फुके, प्रा. सुजाता भोरे आदी परिश्रम घेत आहेत. विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या सूचनेनुसार धायखिंडी येथे हे शिबीर होत आहे.
