करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वांगी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने (सोसायटी) सभासदांना १० टक्के लाभांश वाटप करण्यात आला आहे. सोसायटीच्या १८०० सभासदांना १३ लाख ४० हजार ८४३ रुपयांचे वाटप करण्यात आले. संस्थेमध्ये ५ कोटी रुपये ठेवी आहेत. तर ५.५० कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती संस्था अध्यक्ष डॉ. विजय रोकडे यांनी दिली.
कार्यक्रमासाठी मकाईचे संचालक युवराज रोकडे, युवा नेते दत्ता बापू देशमुख, व्हॉइस चेअरमन भैरवनाथ बंडगर, सचिव दत्तात्रय शिर्के, माजी चेअरमन साहेबराव रोकडे, गणेश तळेकर, सुरेश भानवसे, माजी पंचायत समिती सदस्य सुहास रोकडे, माजी सभापती लक्ष्मण महाडिक, वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके, पै. आप्पासाहेब चौगुले, भुजंग जाधव, सुरेश रोकडे, शंकर जाधव, नारायण आरकिले, विकास वाघमोडे, बँक इन्स्पेक्टर शिंदे, संचालक विकास पाटील, आप्पासाहेब भोसले, दिनकर रोकडे, भाऊसाहेब गोडसे, नानासाहेब भानवसे आणि सभासद बंधू उपस्थित होते.