करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज (मंगळवारी) दुसऱ्यादिवशी सरपंचपदासाठी 15 तर सदस्य पदासाठी 24 अर्ज दाखल झाले आहेत. प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्या नियंत्रणाखाली ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. शुक्रवार (ता. २०) पर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी मुदत असणार आहे.
सदस्यपदासाठी भगतवाडी येथे 13, उंदरगाव येथे 1, कंदर येथे 1, केत्तुर येथे 1, वीट येथे 7, रावगाव येथे 1 अर्ज आला आहे. तर कावळवाडी, रामवाडी, राजुरी, चिखलठाण, गौंडरे, कोर्टी, निंभोरे, घोटी, केम व जेऊर येथे एकही अर्ज आलेला नाही. सरपंच पदासाठी रामवाडीत 1, भगतवाडीत 4, उंदरगाव येथे 1 कंदर येथे 3, केत्तुर येथे 1, वीट येथे 1, घोटी येथे 2, रावगाव येथे 2 तर कावळवाडी, राजुरी, चिखलठाण, गौंडरे, कोर्टी, निंभोरे, केम व जेऊर येथे एकही अर्ज आलेला नाही.