करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज (सोमवारी) पहिल्याच दिवशी २० इच्छुक उमेदवारांनी अर्ज खरेदी केले आहेत. या कारखान्याची निवडणूक कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तालुक्याच्या राजकारणात केंद्रबिंदु समजल्या जाणाऱ्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची २१ संचालकांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यात पाटील, शिंदे, बागल व जगताप गटाची भूमिका महत्वाची असणार आहे. हा कारखाना सध्या अडचणीत असून बंद आहे. तरीही या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमोलसिंह भोसले व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार शिल्पा ठोकडे या काम पाहत आहेत.