करमाळा (सोलापूर) : आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा नगरपालिका कार्यक्षेत्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनाअंतर्गत प्रभाग क्रमांक एक मधील सुमंतनगर भागात २० लाख रुपये गटार बांधकामासाठी मंजूर झाल्याची माहिती माजी नगरसेवक संजय सावंत यांनी दिली तसेच या भागात आता लवकरच गटार बांधकाम सुरू होईल, असे ते म्हणाले.

