करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वाशिंबे ग्रामपंचायतीच्या वतीने १५ वा वित्त आयोगाअंतर्गत दीपावलीच्या मुहूर्तावर सरपंच तानाजी झोळ यांच्या मार्गद्शनाखाली २० सौर दिवे बसवण्यात आले आहेत. याचा शुभारंभ हभप धनाजी जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपसरपंच अमोल पवार, ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील, धोंडीराम कळसाईत, श्रीहरी टापरे, राहुल शिंदे तसेच मनोज झोळ, आनंद झोळ, शैलेश झोळ, हनुमंत निंभोरे, निलेश कुलकर्णी, गणेश पाटील, देविदास राऊत, अशोक ननवरे आदी उपस्थित होते.

