करमाळा (सोलापूर) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात सादर केलेल्या पुरवण्या मागणीत करमाळ्यातील २५ कोटींच्या कामाची यादी आहे. विशेष म्हणजे या वर्षीपासून मतदार संघातील ग्रामीण मार्गांना निधी मिळण्याची तरतूद करण्यात आली असून करमाळा मतदारसंघातील ग्रामीण मार्गांच्या विकासासाठी तब्बल 18 कोटी तर राज्यमार्गाच्या व प्रमुख जिल्हा मार्गाच्या विकासासाठी 7 कोटीची तरतूद झाली असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
कुगाव- चिखलठाण नं 1- शेटफळ- जेऊर- कोंढेज- साडे रस्ता, कुंभारगाव ते घरतवाडी रस्ता, कुस्करवाडी ते इजिमा 78 रस्ता, बोरगाव ते निलज रस्ता, रावगाव- दगटवाडी- शेळके वस्ती- वाघमारे वस्ती ते वडगाव रस्ता, महादेववाडी ते पणासे वस्ती रस्ता, मुंगशी ते नाडी रस्ता, भोसरी ते चिंकहिल रस्ता, म्हैसगाव ते पवार वस्ती रस्ता, दहिवली ते पवार वस्ती रस्ता, निमगाव ते वरपे वस्ती रस्ता, अंबड ते बिरोबा वस्ती रस्ता, कुर्डू ते घाटणे ते ढाणे वस्ती रस्ता, पिंपळ खुंटे ते वडाचीवाडी रस्ता, निमगाव ते काशीद वस्ती रस्ता, भुताष्टे ते सापडणे रस्ता, रामा 203 (वडाचीवाडी) ते सापटणे (भोसे) रस्ता, चिंचगाव ते लहू रस्ता, चोभेपिंपरी ते गवळेवाडी बारलोणी रस्ता, पिंपळखुंटे ते कचरे वस्ती रस्ता, शेडशिंगे ते पिंपळनेर रस्ता, लऊळ ते सापडणे रस्ता, बारलोणी ते काशीद वस्ती रस्ता, रोपळे बिटरगाव शिंगेवाडी रस्ता, बिटरगाव ते नाडी रस्ता, कव्हे ते शिंगेवाडी रस्ता, कुर्डू ते दोघे पिंपरी रस्ता, कुर्डू ते घाटणे रस्ता, रोपळे ते मुंगशी रस्ता या प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे.
आमदार शिंदे म्हणाले, अजित पवार यांच्याकडे मतदार संघातील विविध विकास कामासाठी 100 कोटीची मागणी केली होती. त्यापैकी या अधिवेशनात 25 कोटीच्या निधीला मंजुरी दिलेली असून उर्वरित कामे हिवाळी अधिवेशनात होतील. 2515 चा निधी मिळविण्यासाठी आपण प्रयत्नशील असून लवकरच मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी येईल. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये मंजूर असलेल्या कामावरील स्थगितीही उठेल. जुलै 2022 ते जुलै 2023 या कार्यकाळामध्ये निधी मिळण्यास अडचणी आल्या होत्या. परंतु आता तो अनुशेष भरून काढण्याचे काम सुरू आहे.