सोलापूर : सोलापूर शहरात आज (मंगळवारी) रन फाँर लेप्रसी मॅरेथॉन स्पर्धा झाली. ही मॅराथॉन शहरातील मध्य वस्ती भागात 3 किलोमीटरवर झाली. या मॅरेथॉनमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, सिव्हिल हॉस्पिटल, वैद्यकीय महाविद्यालय, कोषागार कार्यालय, क्षयरोग कार्यालय, महापालिका व शहरातील शासकीय विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी अशा 510 जणांनी सहभाग घेतला होता. सोलापूर शहरात कुष्ठरोगबाबत प्रबोधन कार्यात सहकार्य केले.

या मॅरेथॉनचे नियोजन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, आयुक्त शितल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यात पुरुष गटात सुमित जावीर (प्रथम क्रमांक), देवराज गौडनवरु (द्वितीय क्रमांक), रोहित व्होराडे (तृतीय क्रमांक) तर उत्तेजनार्थ सोमनाथ हरनाळकर तसेच महिला गटात राजश्री नाकाळी (प्रथम क्रमांक), निकिता बिनगुंडी (द्वितीय क्रमांक), गीतांजली धावणे (तृतीय क्रमांक) व उत्तेजनार्थ धानेश्वरी हिरापुरे पारितोषिक देण्यात आले.

ही मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, मनपाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मिनाक्षी सोनवणे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. अनिरूध्द पिंपळे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. सरवदे, माहिती अधिकारी रफिक शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेश पवार व जिल्हा क्रीडा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, जिल्हा अँथलेटिक संघ अध्यक्ष राजु प्याटी यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

मॅराथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. मोहन शेगर, जिल्हा केंद्रीय पथक वैद्यकीय अधिकारी डॉ. उमा झाड, पनाकुप वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा माने यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *