करमाळा (अशोक मुरुमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दाखल झालेल्या १६१ अर्जांपैकी ६ इच्छुकांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. यामध्ये वालचंद रोडगे यांचे हमाल तोलार गटात एकाच ठिकाणी दोन अर्ज होते, त्यातील एक अर्ज राहिला आहे. विद्यमान उपसभापती चिंतामणी जगताप यांच्यासह सहा अर्ज नामंजुर झाले आहेत. १५४ अर्ज मंजूर झाले असून आजपासून (मंगळवार) सोमवारपर्यंत (ता. २६) अर्ज मागे घेता येणार आहेत.
मंजूर अर्जामध्ये सहकारी संस्थामध्ये सर्वसाधारण ५२, महिलामध्ये १५, ओबीसीमध्ये ९ व एनटीमध्ये ९ अर्ज आहेत. ग्रामपंचातमध्ये ६५ अर्ज आहेत. व्यापारीमध्ये मनोज पितळे व परेशकुमार दोशी असे २ व हमाल तोलारमध्ये १ अर्ज राहिला आहे. या जागा बिनविरोध झाल्याअसून अधिकृत घोषणा बाकी आहे.
सहकारी संस्था सर्वसाधारणमध्ये चिंतामणी जगताप, अशोक शेळके, नवनाथ दुरंदे, महेशराजे भोसले पाटील व ओबीसीमधून आनंद आभंग. ग्रामपंचायत एसीमधून बाळू पवार यांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. बाळू पवार यांचा एक अर्ज मंजूर झाला आहे तर एक नामंजूर झाला आहे. नामंजूर झालेल्या त्यांच्या अर्जाला व सुहास ओहोळ यांना अनुमोद असलेल्या व्यक्तीची सही आहे म्हणून हा अर्ज नामंजूर झाला.
बाजार समितीतीची थकबाकी, बाजार समितीची मालमत्ता, शेतकरी असल्याचा दाखला नसने अशा कारणावरुन अर्ज नामंजूर झाले आहेत. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून आबासाहेब गावडे यांनी काम पाहिले.