Inauguration of Raje Ravrambha Shetkari Producer Company Agro Mall in Karmala tomorrowInauguration of Raje Ravrambha Shetkari Producer Company Agro Mall in Karmala tomorrow

करमाळा (सोलापूर) : केंद्र सरकारच्या 10 हजार APO अंतर्गत शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या करमाळा तालुक्यातील राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या ‘ॲग्री मॉल’चे मंगळवारी (ता. १२) सकाळी ११ वाजता उद्घाटन होणार आहे. यावेळी सभासदांना शेअर प्रमाणपत्राचे वाटपही केले जाणार आहे, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष डॉ. विकास वीर यांनी दिली आहे.

डॉ. वीर म्हणाले, राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीची स्थापना केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे झाली. या कंपनीचे 383 सभासद आहेत. जानेवारी 2023 मध्ये वरकटणे येथे कंपनीचे कार्यालय सुरू झाले. आता करमाळ्यात ‘ॲग्री मॉल’ सुरू केला जात आहे. याच्या उद्घाटना नाबार्डचे सीजीएम अनंतकुमार रावत, सोलापूरचे जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने, डीडीएम नितीन शेळके तसेच वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे श्रीकांतीलाल गीते, समीना पठाण, प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव, गटविकास अधिकारी मनोज राऊत, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, सह्याद्री ऍग्रो नाशिकचे सचीन वाळुंज उपस्थित राहणार आहेत.

कंपनीने शेतकऱ्यांची केळी खरेदी- विक्री सुरू केलेली असून प्रायोगिक तत्त्वावर ती 1 कंटेनर दुबई येथे एक्सपोर्ट केलेला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी करमाळा येथे ॲग्रो मॉल सुरू केला असून या माध्यमातून शेतकऱ्यांना खते, बी- बियाणे व कीटकनाशके माफक दरामध्ये उपलब्ध करून दिली जात आहेत. जैन कंपनीची डीलरशिप घेतलेली असून त्यांचे पीव्हीसी पाईप, ठिबक, आंबा, डाळिंब व केळीची टिशू कल्चर रोपे सभासदांना विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

15 ऑगस्टला दिल्ली येथे ध्वजारोहण समारंभासाठी कंपनीच्या अध्यक्षांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण केंद्र सरकारकडून दिले होते. सभासदांसाठी पॅक हाऊस, कोल्ड स्टोरेज उभारणी, क्लिनिंग, ग्रीडींग व पॅकेजिंग हाऊस उभारणे, सभासदांना माफक दरामध्ये माती परीक्षण करून देणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. शेतकऱ्यांना एकाच छताखाली सर्व सोयी सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असून शेतकऱ्यांना शेतीमध्ये लागणारे सर्व अवजारे, फवारणी पंप इत्यादी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *