करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ७५ लाख मंजूर झाले आहेत, अशी माहिती जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांनी दिली आहे.
चिवटे म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा नियोजनमधून करमाळा तालुक्यातील विविध विकास कामासाठी निधी मंजूर झाला आहे.
विकासनिधी मिळालेल्या गावामध्ये कोंढज येथील खत्री दुकान ते महादेव मंदिर रस्ता ३ लाख, भैरवनाथ मंदिर छबीना मार्ग रस्ता ४ लाख, सरपडोह नलवडे वस्ती ते दत्त मंदिर रस्ता ४ लाख, निमगाव येथील निमगाव बस स्टॅन्ड ते पठाडे वस्ती रस्ता ४ लाख, पांडे येथील मस्जिद रस्ता ४ लाख, सावतामाळी रस्ता ४ लाख, महाडिक वस्ती येथील रस्ता १० लाख, शेलगाव क. येथील नागनाथ मंदिर ते चोपडे वस्ती रस्ता ४ लाख, वंजारवाडी येथील पिंपळाचा रस्ता ५ लाख, वसंत बिनवडे घर ते गणेश कराड घर रस्ता १.५० लाख, मोरवड येथील स्मशानभूमीसाठी ५ लाख, खडकी येथील एसटी स्टॅन्ड ते महादेव मंदिर रस्ता ७ लाख, अंजनडोह येथील मसोबा मंदिर रस्ता ६ लाख, शेळके वस्ती रस्ता ४ लाख, खडकेवाडी अक्षय शेळके घर ते विक्रम शेळके रस्ता घर रस्ता १.५ लाख, कोळगाव येथील आतकरे वस्ती सुरवसे वस्ती पाटील वस्ती, गौंडरे कोळगाव शिव रस्ता ४ लाख, आळजापुर येथील जातेगाव रस्ता ते बुवासाहेब काळे घर रस्ता ४ लाख आदी विकास कामांचा समावेश आहे.