करमाळा (सोलापूर) : अनेक वर्षांपासून रखडलेल्या पोंधवडी चारीचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण झाल्याने हुलगेवाडी शिवारातून शितोळे वस्तीकडे जाणाऱ्या अपूर्ण चारीच्या कामाची सुरुवात नुकतीच आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली आहे. ही चारी 440 मीटर असून त्यासाठी सव्वा मीटर व्यासाच्या सिमेंट पाईप वापरण्यात येणार आहे. या चारीचा लाभ हुलगेवाडीतील शेतकऱ्यांना होणार आहे.
कुकडी प्रकल्प डावा कालवा अंतर्गत पोंधवडी चारीचे काम निधीअभावी 2009 पासून रखडले होते. या चारीच्या कामासाठी निधी मिळावा म्हणून विहाळ, कोर्टी, गोरेवाडी, हुलगेवाडी, कुस्करवाडी, राजुरी, वीट, अंजनडोह या गावातील नागरिक पाठपुरावा करत होते. कॅनॉलचे कामे रखडल्यामुळे कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये कुकडीचे पाणी दाखल झालेले नव्हते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार शिंदे यांनी कुकडी प्रकल्प अंतर्गत येणारी पोंधवडी चारीचे काम पूर्ण करून या चारीवरील गावांना आपण पाणी देऊ, असे वचन दिले होते. याची पूर्ती 2023 मध्ये शिंदे यांच्याकडून झाली.
पोंधवडी चारीसाठी 9 कोटीचा निधी प्राप्त झाल्यामुळे या चारीवरील कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शितोळे चारीच्या शुभारंभ प्रसंगी निलकंठ अभंग, देविदास हुलगे, सुभाष अभंग, रुपचंद गावडे, निवृत्ती माने, पोंधवडीचे मनोज कोंडलिंगे, कंपनीचे व्यवस्थापक दळवी, छगन हुलगे, रघुनाथ वाघमारे, सुनील जाधव, जालिंदर वाघमारे, कारभारी कवचाळे, राजेश येळे, शिवाजी मासाळ, मालोजी पाटील, ऋषिकेश हुलगे, गणेश कवचाळे, सुरेश कवचाळे, संतोष जाधव, सुशांत काळें, प्रदिप हुलगे, नितीन सोलंकर, सचिन वाघमारे, मच्छिंद्र साळवे उपस्थित होते.